…आणि अखेरीस कृष्णेचे पाणी माणगंगेला मिळाले !
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगणहल्ली गावच्या प्रभाकर जाधव आणि त्यांच्या सहकार्यांचे जाहीर कौतुक.
या शिंगणहल्ली गावाचा कोणत्याही पाणी योजनेत समावेश नाही. कोरडा नदीच्या काठावरचे हे गाव.
परंतू कुंभारी आणि कासारी (दोन्ही तालुका जत) या दोन गावांत म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आले तेंव्हा या प्रभाकर जाधव आणि त्यांच्यासारख्या माणदेशी माणसांनी आपली शक्कल लढवली. म्हैसाळ योजनेचे पाणी शिंगणहल्ली गावात कसे पोहोचू शकते याबाबत एक प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह यांनी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. नुसता पाठवलाच असे नाही तर त्याबाबत पाठपुरावा केला. अखेरीस आपल्या माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला तालुक्यातील लोकांना लाभ होतोय हे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या लक्षात आले. तेंव्हा लोकांच्या मागणीवरून त्यांनी म्हैसाळचे पाणी (अर्थात कृष्णेचे) कोरडा नदीत सोडण्याच्या सुचना दिल्या. तसे आदेश गेल्या आठवड्यात निघाले आणि आज कोरडा नदीतला शिंगणहल्ली बंधारा भरला आणि पुढे कृष्णामाई माणगंगेच्या भेटीच्या ओढीने धावू लागली. …. आज २८ मार्च २००३ रोजी सकाळी ११ वाजता माई माणगंगेची ओटी पाणी पाण्याने गच्च भरली. ओथंबून वाहू लागली आणि माणगंगा धन्य झाली. माण माती मोहरली.
*****
कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना या नावाने ही योजना सर्वप्रथम १९८४ साली पुढे आली. योजनेत फक्त ताकारी उपसा सिंचन योजनेचा समावेश होता. १९८६ साली त्याची व्याप्ती वाढवून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा त्यात समावेश करण्यात आला. ही योजना केवळ सांगली जिल्ह्यासाठी होती. १९९५/९६ मध्ये त्यात तिसर्यांदा बदल करून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांचा समावेश करण्यात आला.
या योजनेत मिरज, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील १७७ गावातील ८१,१६७ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. सांगोला तालुक्यातील वायफळवाडी, डिकसळ, हयासवाडी, पारे, वरळे, घेरडी, हंगरगे, गोंडवाडी या गावातील ४000 हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ मिळणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर, लोणार, इरकरवाडी, मारोळी, सलगर खु., सलगर बु. या गावातील ६000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
म्हैसाळ योजनेचे पाणी जत कालव्याच्या २८ व्या किलोमीटरमधून गळवेवाडी येथे कोरडा नदीत सोडण्याचे नियोजन आहे. तेथून १५ को. प. बंधारे भरून घेतले जाणार आहेत. कोरडा नदीतून माणगंगा
नदी तर माणगंगा नदीतून भीमेत पाणी पोहोचणार आहे. भविष्यात कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा नदीला येण्याचा मार्ग.
म्हैसाळ योजना =
■ पाच टप्प्यात पंपहाऊस
■ उध्र्वगामी नलिकेची कामे पूर्ण
■ १0९ पंप कार्यान्वित
■ १,00,९१४ अश्वशक्ती विजेचा वापर
■ १0२ मे. वॅट विजेची गरज
■ १७.३६ टीएमसी पाणी कृष्णेतून उचलणार अशी आहे ही योजना तांत्रिक माहिती
■ मूळ नाव : कृष्णा कोयना उपसा
सिंचन योजना
■ प्रथम मान्यता : १९८४
■ दुसरी मान्यता : १९८६
■ तिसरी मान्यता : १९९६
■ अद्ययावत किंमत : २२२४ कोटी
■ आतापर्यंतचा खर्च : १६८८.२६ कोटी
■ एकूण क्षेत्र: ८१,१६७ हेक्टर
■ सिंचन निर्मिती : २0,000 हेक्टर

"कृष्णा मिळाली माणगंगेला "
|
( अशी आहे ही योजना तांत्रिक माहिती )

No comments:
Post a Comment