Saturday, April 13, 2013

अग्रणी माऊली च्या कामाबाबत सरकारही सकारात्मक भूमिकेत


  1.  आता अग्रणी माऊली च्या कामाबाबत सरकारही सकारात्मक भूमिकेत आलेय … 
    सरकारी अधिकारी लोकसहभाग कामाकडे कसे पाहतात ,या अनुभव जल बिरादरी टीम ला काल दिसून आला .विभागिय उपायुक्त श्री इंद्रजीत देशमुख यांनी पुढाकार घेऊन सांगली झेड पी मध्ये काल शुक्रवारी सकाळी येक महत्वाची बैठक घेतली.त्यात खूप वेगवान निर्णय झालें. नागपूरहूनसांगली येथे अलीकडेच बदलून आलेले मुख्य कार्यकारी अभियंता ( जिल्हा परिषद ) श्री हवेलीकर यांनी जल बिरादरीची "लोक सहभागा"बाबतची भूमिका समजून घेतली . डॉक्टर राजेंद्रसिंग यांनी त्यांच्या हजारो सहका-या बरोबर मिळून राजस्थानमध्ये ७ नद्या बारमाही,पाणीदार केल्या,त्यांचा आदर्श फक्त बोलण्यातून न दाखविता कृतीतून दाखविला पाहिजे,असा संकल्प "अग्रणी"च्या काठावरील लोकांनी केला आहे. संत,समाज,आणि शासन यांची नदी रक्षणाची जबाबदारी असते ,हे राजेंद्रसिंग नेहमी सांगतात ते आपण येथे करायचे,असा लोकांचा निश्चय आहे.हे सर्व अधिकार-यांना समजावून सांगितले. मग त्याची प्रचीती काल येथे शासकीय मंडळीनी दाखविली्‌ हा विषय माध्यमांनी खूप चांगला उचलून धरला होता,त्यामुळे लोकापर्यंत या विषयाचे गांभीर्य पोहोचले होते. आह्मी सांगली जिल्हा परिषदेचे सी ई ओ,डॉक्टर नारनवरे यांच्या दालनात दीर्घ चर्चा केली . त्यांनी सर्व विषय समजून घेतला। त्यांनी उपस्थित अधिकार-यांना सूचना केल्या आणि पुढील चार तासामध्ये जे महत्वाचे नकाशे,कृती आराखडा,toposheet प्रमाणे लागणार-या नोंदी मिळाल्या- ज़ो सिमेंट बंधारा लोक सहभागातून बांधायचा आहे ,त्याची रचना कशी असावी,हे निश्चित झाले अगोदर गोपालसिंग (राजेंद सिंग़ यांचे सहकारी )यांच्या बरोबर लोकांनी संपूर्ण अग्रणी पाहिली (खानापूर परिक्षेत्रातील)होती त्यामुळे पुढील योजना ठरली होती.सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सूर्यवंशी यांनी सर्व माहिती घेतली आणि अवघ्या दोन तासामध्ये नकाशा,आराखडा नमुना उपलब्ध करून दिला- पुढील काम सोपे झाले. आज श्री हवेलीकर आणि गावकरी ,जल बिरादरीची टीम यांनी गावकर-यांनी ठरविलेल्या सिमेंट बंधा -याच्या जागा पाहिल्या आणि आता येत्या काही दिवसात त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरु झालेले दिसेल.पाण्याचे काम किती प्रेरणादायी असते हे दिवसभराच्या धावपळीमध्ये दिसून आले.-सर्वश्री किरण पाटील ,संजय भोसले,सुकुमार पाटील,श्री चिले (सांगली पाटबंधारे विभाग )डेप्यु अभियंता श्री कुंभार ,शाखा अभियंता पी ए शिन्दे यांनी मोलाचे सहकार्य केले.-त्यांनी working drawing ,estimate याबाबत सूचना केल्या . हवेलीकर हे नागपूरहून दोन महिन्या पूर्वी येथे बदलून आले आहेत.ते म्हणाले 'आता अग्रणीचे काम मार्गी लाऊन ,येका सिमेंट बंधार-याचे drawing ,estimate निश्चित करून मी घरी जाणार"-येथे रुजू झाल्यापासून त्यांनी एंक हि सुटी घेतली नाही ।आता अग्रणी माउलीचे काम अगोदर मग घरचे लग्नकार्य.-- त्यांच्या परिवारामध्ये २८/२ ९ एप्रिल या काळामध्ये लग्न आहे … पण अगोदर अग्रणी …हिच भावना आमच्या टीम ला सर्वत्र दिसून आली- सुनील जोशी (संघटक , महाराष्ट्र जलबिरादरी  संस्था )

No comments:

Post a Comment