पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याबरोबरच वृक्षसंवर्धनही गरजेचे - डॉ. राजेंद्रसिंह राणा
सातारा :
जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब अडवून तो जमिनीत
मुरविण्याबरोबरच वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेणे काळाची
गरज असल्याचे प्रतिपादन जलबिरादरीचे प्रमुख जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा
यांनी केले.
शासनाच्या विविध विभागांकडील योजना, जलबिदारी आणि लोकसहभागातून माण तालुक्यातील माणगंगा नदी पुनर्जिवीत करण्याच्या विशेष मोहिमेचा शुभारंभ आज माण तालुक्यातील कुळकजाई येथील सीतामाई मंदिर परिसरातील माणगंगेच्या उमगमस्थळी जलपूजनाने करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ. राणा बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार जयकुमार गोरे, पुणे विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एस. पऱ्हाड, डॉ. अविनाश पोळ यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, अधिकारी, जलबिदारीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माणगंगा नदी लोकसहभागातून पुनर्जिवीत करुन बारमाही करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन करुन डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, माणगंगा नदी पाणीदार बनवून ही नदी वाहती करण्यासाठी सर्वांनी सक्रीय होणे गरजेचे आहे. नदीपात्रातील झाडे-झुडपे, कचरा, गाळ, माती लोकसहभागातून काढून नदीपात्र मोकळे करावे. यामुळे जमिनीवर पडणारे पाणी अडले जावून ते जमिनीत मुरले जाईल. यातूनच माणगंगा नदी पुनर्जिवीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजस्थानमध्ये दुष्काळी भागात जलबिरादरीने पुढाकार घेऊन लोकसहभागातून केलेल्या दुष्काळ निवारणाच्या कामांबाबतचे आपले अनुभव त्यांनी यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना सांगितले. लोकांचे जीवन पाणीदार बनवण्यासाठी जमिनीवरचे पाणी साठवून ते मुरविण्याच्या कामात आता लोकांनीच सक्रीय व्हावे. उन्हापासून पाण्याचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची विशेष मोहीम लोकांनी उचलून धरावी, असे आवाहनही त्यांनी केले. माणगंगा नदी पुनर्जिवीत करण्यासाठी प्रशासनाने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असून लोकांनीही याकामी सक्रीय व्हावे, असे आवानही त्यांनी केले.
श्री. देशमुख म्हणाले, शासकीय यंत्रणा, जलबिरादरी आणि लोकसहभागातून माणगंगा नदी पुनर्जिवीत करुन वाहती करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून गावागावातील लोकांनी याकामी योगदान द्यावे. माणगंगा नदी पुनर्जिवीत करण्यासाठी प्रशासनामार्फत गावनिहाय नियोजन केले जाईल. याकामी लोकांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोलाचा असल्याचेही ते म्हणाले.
पुणे विभागात दुष्काळ निवारणाच्या कामांना प्रशासनाने गती दिली असून जलसंधारणाची विविध कामे लोकसहभागातून घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माणगंगा नदी बारमाही वाहती करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून जनतेने याकामास सहकार्य करावे, असे आवानही विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.
आमदार जयकुमार गोरे यांनी सध्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी शासन राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. माणगंगा नदी पुनर्जिवीत करण्याच्या कामात गावकऱ्यांनी सक्रीय होऊन नदी पुनर्जिवीत करण्यास मदत करावी, असे आवानही त्यांनी केले.
डॉ. रामास्वामी एन. म्हणाले, माणगंगा नदी पुनर्जिवीत करुन बारमाही करण्याचा प्रशासनाचा संकल्प असून यासाठी नदीकाठावरील 16 गावांतील ग्रामस्थांच्या बैठका घेऊन याबाबत रुपरेषा ठरविण्यात आली आहे. नदीपात्रातील झाडे-झुडपे, गाळ, कचरा काढून नदी मोकळी करण्याबरोबरच जुन्या 16 बंधाऱ्यांची दुरुस्ती करुन आवश्यकतेनुसार नवीन बंधारे घेतले जातील. याकामी जलबिरादरी, एनजीओ, ग्रामस्थ आणि शासन यंत्रणांचे योगदान घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. या परिसरात वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाबरोबरच ल्युझबोल्डर, मातीबंधारे, सिमेंट बंधारे आदी कामे घेण्यात येणार आहेत.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलपूजनानंतर वृक्षारोपण करण्यात आले. सीतामाई मंदिर परिसरात माणगंगा व बाणगंगा उगमस्थानांची माहिती डॉ. राणा यांनी गावकऱ्यांकडून घेतली. त्यानंतर माणगंगेचा उगमस्थळ असलेल्या कुळकजाईमधील कळसकरवाडी येथील उमगस्थानांची पाहणी केली.

मान्यवरांनी रचला दगडी बांध
माणगंगेच्या उगमस्थळी कळसकरवाडी येथे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, डॉ. राणा आणि मान्यवरांनी स्वत: दगड गोळा करुन अल्पावधीत दगडी बंधारा तयार केला. यामध्ये डॉ. राणा, आमदार जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दगड उचलण्याची सुरुवात करताच सर्वच ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी मान्यवरांकडून प्रेरणा घेऊन अल्पावधीत दगडी बंधारा तयार केला. मान्यवरांच्या या दगडी बंधाऱ्याच्या उभारणीमुळे जलसंधारणाची ओढ दिसून आली.
त्यानंतर भांडवली येथील केटी बंधाऱ्याची पाहणी केली आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यानंतर या मान्यवरांनी बिदाल येथील ब्रिटीशकालीन बंधाऱ्यांची पहाणी केली. गावकऱ्यांकडून या बंधाऱ्यांचा आणि पाऊसमानाची गावकऱ्यांकडून माहिती घेतली. या बंधाऱ्यात पाणी कसे साठेल याविषयी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण पाणीसाठविण्याबाबत बंधाऱ्यांची उंची वाढविण्याबरोबरच बंधाऱ्यामध्ये चर काढून शेतात पाणी जाणार नाही, याबाबत आवश्यक उपाययोजनांबात गावकऱ्यांशी चर्चा केली. यानंतर दहिवडी येथे ग्रामस्थांशी चर्चा केली.
या दौऱ्यात प्रांताधिकारी धनाजी पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. प्रवीण, निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता तानाजी झेंगटे, तहसीलदार महेश पाटील, गटविकास अधिकारी मोनिका रणदिवे, श्रीराम नानल आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment