" माणगंगा " होणार लोक सहभागातून बारमाही :
पाणीवाले बाबा राजस्थानचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणांनी उचलला विडा ; स्रोत पुन्हा जीवंत करणार।
===मोहन मस्कर-पाटील■ सातारा(दैनिक लोकमत, सातारा )
कोरडी आणि ठणठणीत माणगंगा नदी 'बारमाही' करण्याचा विडा दस्तुरखुद्द राजस्थानचे 'पाणीवाले बाबा' डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी उचलला आहे. यासाठी ते 'संत (लोकसहभाग), शासन आणि संस्था' या त्रिसुत्रीचा वापर करणार आहेत. राजस्थानमध्ये त्यांनी पाच मृत नद्या जीवंत करताना जे प्रयोग राबविले, ेतोच प्रयोग ते येथे राबविणार आहेत.
माणगंगा नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई येथे होतो आणि ती पुढे आटपाडीमार्गे सांगोला तालुक्यात जाते. माणगंगा नदीची माण तालुक्यातील लांबी ६५ किलोमीटर असून नदीकाठावर शिंदी खुर्द, कुळकजाई, भांडवली, मलवडी, आंधळी, बोडकी, बिदाल, दहिवडी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द, पळशी, राजेवाडी, देवापूर, पळसावडे, हिंगणी, मनकर्णवाडी ही गावे आहेत. येथे राजेंद्रसिंह लोकसहभागाचे महत्त्व आणि प्रत्यक्ष 'त्रिसुत्री' सांगणार आहेत.
'माण आणि दुष्काळ' समीकरण आहे. येथे दोन वर्षे पाऊसच पडलेला नाही. येथील जनता १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळाची अनुभूती घेत आहेत. २00३ मध्येहीभयावह स्थिती होती. माणचे सरासरी पर्जन्यमान ५00 ते ५५0 मि.मी. असल्याने भविष्यात येथे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत कसा मुरला जाईल, यावर राजेंद्रसिंहांचाभर राहणार आहे.
'माणगंगा' पुनरुज्जीवनाची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामीएन. यांची आहे. सांगोला येथील वैजनाथ घोंगडे आणि त्यांच्या सहकार्यांनी फेब्रुवारी २0१0 मध्ये 'माणगंगा परिक्रमा' केली. त्याचा अहवाल जिल्हाधिकार्यांनी वाचला. आणि घोंगडे यांना गेल्या महिन्यात दहिवडी येथे चर्चेसाठी बोलाविले होते. त्यांच्याकडून माहिती घेतली आणि तत्काळ त्यांच्या समोर राजस्थान, जोहाड आणि राजेंद्रसिंह यांचे कार्य डोळ्यासमोर आले. आठवले. येथूनच खर्या अर्थाने वेग घेतला. त्यांनी तत्काळ पुणे येथील 'जलबिरादरी'चे महाराष्ट्र संघटक सुनील जोशी यांच्यांशी संपर्क साधला. दुरध्वनीवरून राजेंद्रसिंह यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना थेट 'माणगंगा बारमाही'ची संकल्पना सांगितली.
'बारमाही माणगंगा'चे समन्वयक म्हणून महाराष्ट्र बँकेचे माजी जिल्हा अग्रणी अधिकारी श्रीराम नानल यांची नियुक्ती केली आहे. राजस्थान आणि येथे काम केलेले आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि त्यांची टीम याकामी त्यांना सहकार्य करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकसहभाग हा मुख्य घटक समोर ठेवला आहे. डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थानमधील पाच मृत नद्या जीवंत केल्या, तेच प्रारूप माणगंगेसाठी वापरण्यात येणार आहे.
संदीप जठार
नेहमीच कोरडी आणि ठणठणीत पडलेल्या माणगंगा नदीचे भाग्य आता उजळणार आहे. लोकसहभाग आणि इच्छाशक्ती आवश्यक
माण तालुका कायम दुष्काळी असल्याची माहिती मिळाली. यानंतर मी 'माणगंगा' पाणलोटक्षेत्राचा अभ्यास केला आणि काही प्रमुख बाबी समोर आल्या. दोन दिवस मी माण तालुक्याच्या दौर्यावर येणार असून माणगंगा बारमाहीसाठी जलसिंचनाचे साधे आणि सोपे प्रयोग त्याचबरोबर लोकसहभागावर अधिक भर देणार आहे. लोकसहभाग आणि राजकीय इच्छाशक्तीच मागणंगा बारमाही करू शकणार आहेत, असा विश्वास राजेंद्रसिंह राणा यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला. 'बारमाही'अंतर्गत माणगंगा नदीचे स्रोत पुन्हा जीवंत करण्याचा अभिनव प्रयोग होणार आहे. पात्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूचा गाळ काढून स्रोत रिकामे करणार आहेत. यामुळे काठावर असणार्या विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. काठावर वृक्षलागवड त्याचबरोबर बंधारे, माती नाले बंधार्यातील गाळ काढणे आणि नदीमध्ये योग्य ठिकाणी बांध घालण्यात येणार आहेत.

बांधाऐवजी जर ठराविक अंतरावर कृत्रिम डोह तयार केले तर जास्त फायदा होईल.
ReplyDelete