नदी पुनरुज्जीवित करणे म्हणजे नेमके काय ?
नमस्कार , मी काही जल तज्ञ नाही , इंजिनिअर किंवा अधिकारी अगर कुठल्याही एन आर आय चा सदस्य नाही…
एक दुष्काळ ग्रस्त भागातला रहिवाशी म्हणून पाणी या विषयावर सतत लिहिणारा , विविध पाणी योजना वगैरे चा थोडाफार अभ्यास करणारा आणि जे योग्य वाटले ते बेधडक लोकांच्या समोर मांडणारा एक साधा पत्रकार आहे.
टेंभू उपसा जल सिंचन योजना , या योजनेचा आराखडा चुकलाय , नियोजन फसले आहे , भ्रष्टाचारहि मोठ्या प्रमाणावर झालेला आहे … एक तर हि योजना कधीच संपूर्ण होणार नाही, जरी झाली तरी या भागातल्या सगळ्या लोकांना कधीच या योजनेचे पाणी मिळू शकणार नाही. शिवाय या योजनेचे भवितव्य फार तर ५ ते ६ वर्षे इतकेच असेल ….आज ज्या दरात या योजनेचे ज्या काही थोड्या फार भागाला पाणी मिळत आहे , ते इतके महागडे काहीही शेतीत पिकवले तरी परवडणार नाही आणि पंपांची सध्याची अवस्था पाहता ते फार काळ चालणार हि नाहीत …
आता सध्या महाराष्ट्र शासन आणि जल बिरादरी या संस्थे च्या पुढाकाराने जो अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविला जात आहे त्या बाबत ….
हा कार्यक्रम पूर्ण पणे फसलेला आहे , नदी बारमाही वाहती करणे म्हणजे नेमके काय ते कोणालाच नेमके न कळल्याने आजवर एका किमान पावसाळ्याच्या दिवसात का होईना पण गच्च वाहणारया नदीचा गळा घोटण्याचे काम करण्यात आले आहे …
अग्रणीच्या उगमापासूनच कामात गडबड झालेली आहे , अडसरवाडी आणि ऐनवाडी या गावांच्या सीमेवर , नदीच्या उगमाजवळ २८ बाय ३. ५ फुटांचा खड्डा काढण्यात आला आहे … त्यापुढे नदीचे पात्र ८ ते १० फुट रुंद आणि ३ फुट खोल केले आहे …. पुढे बरोब्बर २०० व्या मीटर ला खोदकाम आणि रुंदी करण्याचे काम अचानक थांबवलेले आहे . दरम्यान कामातली निघालेली माती किंवा गाळ या पात्राच्या दोन्ही काठांवर ५ ते ६ फूट उंच रचून ठेवला आहे … नंतर २० फुटांनंतर पुढे खोली आणि रुंदी करण परत सुरु केले आहे … इथे नदीला दोन छोटे छोटे येणारे प्रवाह (ओघळ स्वरूपातले ) अक्षरश : बांध घालून असे बंद केलेत कि त्याचे पाणी नदीत येवू शकतच नाही… पुढे तामखडी ते जाधववाडी रस्त्या पर्यंत पात्र १२ ते १५ फुट खोल आणि ८ मीटर रुंद केले आहे , हे करताना निघालेला गाळ दोन्ही बाजूंवर अशा पद्धतीने रचला आहे कि शेतातले अतिरिक्त पावसाचे पाणी नदीत उतरूच शकत आणि परिणामी दोन्ही बाजूंना आणखी दोन प्रवाह तयार होऊन शेती पिकांचे नुकसान झाले आहे ….शिवाय शेतात सखल भागात पाणी साचून राहत आहे .त्यानंतर पुढे गोरेवाडी , बलवडी , बेणापूर , सुलतान गादे , आणि करंजे पर्यंतच्या नदीच्या प्रवासात हि असेच काम झाले आहे. एक तर या नदीला मिळणारे सगळे छोटे छोटे ओघळ , नाले मुजावले आहेत किंवा बंद केले आहेत . शिवाय हजारो टन वाळू गाळ काढण्याच्या नावाखाली नदीतून उपसण्यात आली आहे. नदी पात्र पूर्ण पणे खरवडण्यात आलेले आहे …विशेष म्हणजे जिथे वाळू असेल तिथेच खोली करण , रुंदीकरणाची कामे झाली , जिथे वाळू निघणार नाही असे वाटले त्या बलवडीच्या तब्बल २ किलोमीटर अंतरावर कामच केले नाही
नदीत गेल्या दोन वर्षात ६ ते ७ बंधारे बलवडी आणि बेणापूर हद्दीत कृषी विभाग आणि लोक सहभाग यातून उभारले आहेत. यातल्याच पहिल्या लोक सहभागाने बांधलेल्या बंधारयात अर्ध्याभरात पाणी आहे…. पुढचे सगळे बंधारे कोरडे ठाक आहेत … त्या नंतर सुलतानगादे ते करंजे या नदी पात्रात जल युक्त शिवार योजनेतून तब्बल ३२ लाख रुपये खर्चून कामे केली आहेत … पण यात नदीतली ६ ते ८ फुट खोलीवरची वाळू उपसली आहेच परंतु शासनाच्या पैशात नदीचे पात्रच बदलण्यात आले आहे. विठोबा मदने यांच्या काठावरच्या शेतात चक्क बुलडोजर फिरवून हा उद्योग केला आहे … परिणामी १२० अंशाचे पात्र आता थेट ९० अंशाचे झाले आहे …तसेच शासनाच्या पैशावर खासगी राजकीय नेते आणि गाव टग्यांच्या शेतात बांध घालून देणे , शेत जमिनी सपाट करून देणे , विहिरी काढून देणे असले भलतेच उद्योग नदी पुनरुज्जीवनाच्या नावावर केले गेले आहेत. त्यामुळे खरे तर अग्रणी च्या अस्तित्वावरच घाला आला आहे पण प्रशासन आणि जल बिरादरी एकमेकांची पाठ थोपटून घेत आहेत ….
1 करंजेत असे बदलेले पात्र …
2 शासनाने जल युक्त शिवार योजनेतून चक्क नदी पात्रातच अशा विहिरी काढून दिल्या आहेत…
3 बलवडीत वाळू निघणार आही असे वाटून २ किलोमीटरचे खोलीकरण आणि रुंदी करणाचे कामच केले नाही ..
4 जल युक्त शिवार योजनेतून नदी काठाच्या काही धन दांडग्या शेतकरयाना त्यांच्या शेत जमिनीना धोका होऊ नये म्हणून चक्क असे बांध घालून दिले आहेत.
5 करंजे गावातील नदीतले अतिक्रमण दाखवताना ग्रामस्थ भानुदास सूर्यवंशी एकूणच नदी पुनरुज्जीवित करणे म्हणजे नेमके काय ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे

No comments:
Post a Comment