Tuesday, April 9, 2013

नजिक नाझरे श्रीधर कवींचे नदी माणगंगा,

" नजिक नाझरे श्रीधर कवींचे नदी माणगंगा,
नित्य नांदते खेडे माझे धरुनी संत संगा "
 - महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी महाकवी ग. दि. माडगुळकर.
  माणगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेला आणि सदैव दुष्काळी भाग म्हणजे आपला माणदेश !!! या माणदेशात आटपाडी, माण, खटाव, सांगोला, कवठेमहांकाळ, जत असे कायम दुष्काळी तालुके येतात. आपल्या भागात मुळातच पाउस अत्यंत कमी पडतो त्यामुळे नदी,नाले आणि ओढे हे वर्षातील एखादा महिना वाहताना दिसतात. इतर वेळी या भागात असतो तो फक्त दुष्काळ... 
    अजूनही कित्तेक तास लोडशेडिंग, शेती मध्ये एकही हमिपुर्वक पैसे मिळवून देणारे पिक नाही. शेतीसाठी आवश्यक असणारा जमिनीचा पोत आपल्या जमिनीमध्ये नाही. आपली जमीन खडकाळ मुरमाड मग शेती तरी कशी करायची. त्यातच शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी अत्यंत दुर्मिळ. आपल्याकडे अजून पर्यंत कालव्याचे पाणी पोहचलेच नाही.  सध्या आपल्याकडे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अनेक गावांना पिण्याचे पाणी ट्यांकर ने पुरवावे लागते आहे. ट्यांकर भरण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. जनावरांना चारा नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही. म्हणून त्यांना चारा छावणी मध्ये जावे लागते आहे. माणदेशात अनेक चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. दुष्काळाशी सामना करण्यात प्रशासनाचा बहुतांशी वेळ खर्च होत आहे.  आपल्या माणदेशात अजून औद्योगिक विकासाची गंगा पोहचली नाही. त्यामुळेच लोकांना आपला गाव सोडून शहराकडे धाव घ्यावी लागते.
 गदिमांची, श्रीधर कवींची माणगंगा नदी आज आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. पाण्याविना तिची माया आटत चालली आहे. तमाम माणदेशी माणसांनी एकत्र येवून आपल्या  माणदेशातली हि गंगा वाचवली पहिजे
माणगंगा नदी सांगली जिल्ह्याच्या ईशान्य भागातील आटपाडी तालुक्यातून आग्नेय दिशेस वाहते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह फक्त ३५ किमी. इतका कमी असला तरी तिच्या उपनद्या मात्र खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ तालुक्यांतील पाणी वाहून आणतात. कोरडा नदी जतच्या जवळपास उगम पावते. उत्तरेस वाहत जाऊन ती जिल्ह्याच्या बाहेर माणगंगेस मिळते.आणि हि  माणगंगा नदी पुढे भीमा नदीला मिळते. सरकारी दप्तरात माणदेशातील सर्वात मोठ्या माणगंगा नदीला माण नदी म्हणतात परंतू लाखो माणदेशातील माणसांचे अस्तित्व करोडो वर्षांपासून टिकवून ठेवणारी हि माण नदी माणदेशाची गंगाच आहे. तिला भारतातल्या पवित्र गंगा नदी इतकेच पावित्र्य आहे, असे मला वाटते …


तमाम माणदेशी दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरेल.  अशी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे बारमाही माणगंगा  प्रकल्प .
या अंतर्गत कृष्णा - माणगंगा नदी जोड़ प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे . आपल्या देश्याच्या राष्ट्रीय नदी जोड़ कार्यक्रमांतर्गत पुरग्रस्त भागातील पाणी दुष्काळी भागातील नद्यांच्या खोरयात सोडायच्या भूमिकेला बळ देण्या साठी  हां प्रकल्प उपयोगी पडणार आहे . तसेच कृष्णेच्या खोरयातिल गावांना दरवर्षी बसणारा महापुराचा तडाखा आणि दुसरीकडे अति अति तुटिच्या माणगंगा, येरळा, अग्रणी या खोरयातल्या लोकांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला दूर होणार आहेत .या योजनेत विज वापर नाही . पाणी उचलायचे नाही . तसेच भूमि संपादन करावे लागणार नाही. हा प्रकल्प किफायतशीर ठरणार आहे . 

No comments:

Post a Comment