Friday, May 3, 2013

पाण्याचे उमाळे किंवा हूपूळ

जमिनीत पाणी आहे का नाही हे समजून घ्यायचा असेल तर प्रथम ती किमान ५ फूट रुंद आणि ८०  ते ९० फूट  खोल खोदावी. त्या नंतर त्या खोदलेल्या भागाकडे आतून पाहावे, कि त्यात उभे, आडवे , छेद कुठे दिसतात का ? हे छेद म्हणजेच पाण्याचे स्त्रोत असतात. त्याला पाण्याचे  उमाळे किंवा हूपूळ  असे बोली भाषेत म्हणतात. ते एकदा दिसले कि पाण्याचे अंतर प्रवाह कळतात. जमिनीच्या आतले पाणी किती आणि कुठे आहे ? त्याची दिशा काय आहे ? पाण्याचे हे प्रवाह किती लांब आहेत ? यालाच पाण्याची दोरी असेही म्हणतात ती अगदी स्पष्ट दिसते.
हे आहे, माणदेशातल्या जमिनीत सर्वत्र आढळणारे माण…. याला करल किंवा चोपण असेही म्हणतात. जमीन खोदताना माण लागली कि हमखास पाणी लागणार याची जणू शाश्वतीच मिळते. ही अशी जमीन पाणी धरून ठेवते. माण मातीत असलेल्या नळ्यात किंवा पुंगळ्यात पाणी साठून राहते. यात साठवून ठेवण्याची क्षमताही  जास्त असते. 

No comments:

Post a Comment